होंडा सिटी कंपनीने सुमारे ४,००० कार परत मागवल्या

honda-city
नवी दिल्ली- ३,८७९ कारमध्ये जुने सॉफ्टवेअर असल्याच्या कारणाहून जपानच्या प्रसिद्ध सेडान कार होंडा सिटीच्या कार परत मागविण्यात आल्या आहेत. त्यांचे सॉफ्टवेअर अद्ययावत करुन दिले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.

ज्या गाड्यांची विक्री फेब्रुवारी २०१४- ते नोव्हेंबर २०१४ मध्ये करण्यात आली होती त्यापैकी काही कार परत मागविण्यात आल्या आहेत. कंपनीने या संदर्भात ग्राहकांशी थेट संपर्क साधला आहे. हायड्रोलिक प्रेशर नियंत्रित करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर या कारमध्ये करण्यात आला आहे. काही कारमध्ये हे सॉफ्टवेअर जुन्या आवृत्तीचे आहे तेव्हा नवीन आवृत्तीचे सॉफ्टवेअर यात टाकून दिले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Leave a Comment