
मुंबई : अॅपल आयफोनच्या iOS अॅप फोनची बॅटरी, सामन्यापेक्षा जास्त वापरत असल्याचे लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने मान्य केले आहे. याबाबतची माहिती फेसबुकचे इंजिनिअर मॅनेजर अरी ग्रांट यांनी फेसबुक पेजवर दिली आहे.
फेसबुकने मान्य केली आपली चूक !
ग्रांट यांनी अॅपबाबतचे अनेक मुद्द्यांची माहिती मिळाली होती. त्रुटी ओळखून त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता अॅपचे नवे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोडसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. काही ‘बग्ज’च्या मालिकेमुळे ही समस्या उद्भवल्याचं ग्रांट यांनी म्हटले आहे. तसेच हे अप बॅकग्राऊंडमध्ये फोन लोकेशनचा वापर करत असल्याच्या वृत्ताचे खंडण केले. फेसबुकचे काही दिवसांपूर्वीच iOS अॅप स्मार्टफोनची बॅटरी खूपच वापरत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर फेसबुकने यामध्ये सुधारणा केल्याचा दावा केला आहे.
