भारतात सोनीचा एक्सपीरिया झेड५ लॉन्च

sony
मुंबई : भारतात जपानच्या सोनी कंपनीने एक्सपीरिया झेड५ ड्युअल आणि झेड५ प्रीमियम ड्युअल हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले असून अॅपलच्या आयफोनला आणि सॅमसंगच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सना सोनीचे हे दोन्ही नवे कोरे स्मार्टफोन जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. ६२ हजार ९९० रुपयांना सोनी एक्सपीरिया झेड५ ड्युअल हा स्मार्टफोन, तर ५२ हजार ९९० रुपयांना एकस्पीरिया झेड५ प्रीमियम ड्युअल मिळणार आहे. भारतीय बाजारात येत्या ७ नोव्हेंबरपासून या दोन्ही स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

५.२ इंचाचा एक्सपीरिया झेड५ या फोनचा डिस्प्ले असून तो पूर्ण एचडी असेल. ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल आणि रिअर कॅमेरा 23 मेगापिक्सेलचा दिला आहे. २०० जीबीची यामध्ये एक्सटर्नल मेमरी कार्डची सुविधा देण्यात आली आहे.

सोनी एक्सपीरिया झेड प्रीमियममध्ये ५.५ इंचाचा पूर्ण एचडी क्वालिटी असलेला आणि ३८४०×२१६० पिक्सेल रिझॉल्युशनसोबत डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे. याचा प्रोसेसर ६४ बिट्स ऑक्टोकोर, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल आणि रिअर कॅमेरा २३ मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment