२१ हजारांपर्यंतच्या वेतनाला बोनस

Workers
नवी दिल्ली : औद्योगिक कर्मचा-यांच्या बोनसात प्रतिमाह ७ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्णयामुळे या पुढे कर्मचा-यांनाही बोनस मिळणार आहे. ज्यांचे वेतन प्रतिमाह २१ हजार रुपये आहे, त्यांना या बोनसाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी या बोनसची मर्यादा १० हजार रुपये होती. परंतु केंद्रीय कॅबिनेटने यात सुधारणा करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

सणासुदीच्या दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाने बोनस अदा कायदा १९६५ मध्ये संशोधन करण्यासाठी सुधारणा विधेयकावर विचार करण्याचा निर्णय घेतला. या नव्या प्रस्तावानुसार बोनसचा लाभ मिळविण्याची मर्यादा प्रति महिना १० हजार रुपयांवरून २१ हजार रुपये करण्यात आली आहे. हे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले जाणार आहे. ज्या औद्योगिक कंपनीत २० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.

ही नवी नियमावली नव्या वर्षात १ एप्रिलपासून लागू होणार आहे. बिहार निवडणुकीच्या अगोदर केंद्राने हे पाऊल उचलल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कर्मचा-यांमध्ये कहीं खुशी, कहीं गम अशी अवस्था झाली आहे.

Leave a Comment