महिला प्रवाशांना २५ टक्के सूट देणार एअर इंडिया

air-india
नवी दिल्ली – एअर इंडियाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चार नव्या योजना जाहीर केल्या असून या योजनांचा लाभ बिजनेस क्लास, नियमित प्रवाशांना घेता येणार आहे. यात महिलांना २५ टक्के सूट देण्यात आली आहे.

हवाई प्रवासाची सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढती मागणी असल्यामुळे ही सूट देण्यात असल्याचे एअर इंडियाने सांगितले आहे. या योजनेचा लाभ बिझनेस क्लास, नियमित प्रवाशांना, महिलांना घेता येणार आहे. १ नोव्हेंबरला ही योजना सुरू होणार असून या योजनेचा लाभ १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत घेता येणार आहे.

Leave a Comment