तीन दिवसांत फ्लिपकार्टची २ हजार कोटींची कमाई!

flipkart
मुंबई : देशातील सर्वात लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने बिग बिलियन सेलच्या पाच दिवसांच्या दरम्यान तब्बल २ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

फ्लिपकार्टने बिग बिलियन सेलमध्ये फॅशन, मोबाईल फोन्स, घरगुती साहित्य इत्यादींसाठी ऑफर दिली होती. फ्लिपकार्टचे डिसेंबर अखेरपर्यंत ऑनलाईन शॉपिंगमधील शेअर्स जवळपास ५ टक्क्यांनी वाढवण्याचे ध्येय आहे.

मोबाईल फोन आणि फॅशन प्रकारामध्ये फ्लिपकार्टचे मार्केट शेअर जवळपास ६०-६० टक्के आहे आणि फेस्टिव्हलदरम्यान या दोन्ही प्रकारात मार्केट शेअर ५ ते ५ टक्क्यांनी वाढत असल्याचे फ्लिपकार्टचे कॉमर्स हेड मुकेश बन्सल यांनी सांगितले.

मंगळवारी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने फेस्टिव्ह सीझन सेल्स सुरु केले होते. स्नॅपडीलने सोमवारपासून दिवाळी डिस्काऊंट्स ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये शॉपिंगची धामधूम मोठी असते. त्यामुळे ऑनालाईन शॉपिंग वेबसाईट्ससाठी हे सुगीचे दिवस असतात.

Leave a Comment