
कोची- केरळातील राजकीय पक्ष सीपीएमने राज्यात उबेर अथवा ओला सारख्या ऑनलाईन टॅक्सीसेवेशी स्पर्धा करू शकेल आणि ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी कॉल ऑटो/ टॅक्सीसेवा सुरू केली असून ती सध्या कोचीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे. ही योजना यशस्वी ठरली तर राज्यभरात ती लवकरच सुरू केली जाणार आहे. ही सेवा फकत केरळ राज्यापुरतीच मर्यादित आहे.
केरळात सीपीएमची कॉलटॅक्सी सुरू
सीपीएम प्रवक्त्याच्या मते कार्पोरेट क्षेत्रातील टॅक्सी सेवा कंपन्यांनी राज्यातील टॅक्सी सेवा क्षेत्रात दखल देऊ नये यासाठी ही उपाययोजना केली गेली आहे. आमची सेवा अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर तसेच स्वस्त आहे. कार्पोरेट टॅक्सी सेवांमुळे स्थानिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होतो आहे. यासाठी आम्ही पक्ष व युनियममधून येणार्या लोकांसाठी प्रशिक्षण, सॉफ्टवेअर सोल्यूशन व तंत्रज्ञानाचा सपोर्ट देणार आहोत. तसेच टॅक्सीचालकांना बॅकंचे कर्ज व कॉर्पोरेट टॅक्सी सेवेशी मुकाबला करता येईल अशा सुविधा देणार आहोत.
