त्वचेच्या आरपार पाहणारा हायपरकॅम

hypercam
युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील संशोधकांच्या एका टीमने त्वचेच्या आतील फोटोही काढू शकणारा कॅमेरा विकसित केला आहे. हायपरकॅम असे त्याचे नामकरण केले गेले आहे. या कॅमेर्‍यामुळे एक्सरे व्हिजन मिळते. म्हणजे एखादे फळ आतून चांगले आहे वा खराब झाले आहे हे कळायचे असेल तर या कॅमेर्‍याने फोटो काढल्यास फळाच्या आतील गरही दिसू शकतो. याचा उपयोग अनेक बाबतीत होऊ शकणार आहे. विशेषतः बायोमेट्रिक सिक्युरिटी सिस्टीममध्ये त्याचा वापर करता येणार आहे.

हा कॅमेरा एका प्रोसेसमध्ये १७ वेंवलेंथ स्कॅन करू शकतो. दृष्य अदृष्य वस्तूंसाठी नियर इन्फ्रारेड लाईटचा वापर यात केला गेला आहे. त्यासाठी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा लाईट फोटो एकत्र करू शकतो. त्यात सॅटेलाईट फुटेजपासून ते फिंगरप्रिट तपासणी व अन्न सुरक्षा तपासणी अशा अनेक कामांसाठी वापर करता येतो. हा कॅमरा युबिकॉम्प २०१५ परिषदेत सादर केला गेला. तो अद्यापी व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही मात्र त्याची किंमत साधारण ८०० डॉलर्सच्या दरम्यान असेल असे समजते. हा कॅमरा स्मार्टफोनला लावायचा असेल तर तो ५० डॉलर्समध्येही मिळू शकेल.

Leave a Comment