भारतीय विद्यार्थ्यांना नवसंदेश देणार मार्क झुकेरबर्ग

mark-zukerbarg
नवी दिल्ली : याच महिन्यात राजधानी दिल्लीत फेसबूकचा तरुण सीईओ मार्क झुकेरबर्ग येणार आहे.

२८ ऑक्टोबरला सोशल मीडियातील अग्रगण्य नेटवर्किंग साइट फेसबूकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग दिल्लीत येत आहेत. फेसबूकवर याची पोस्ट झुकेरबर्ग याने केली. नुकतीच सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये फेसबूक मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती.

भारतीयांशी संवाद साधण्यासाठी झुकरबर्ग आयआयटी दिल्लीच्या टाऊन हॉलमध्ये प्रश्नोत्तरात सहभागी होतील. सोशल मीडियावर भारतीय लोक सगळ्यात सक्रिय आणि जोडले गेलेला समुदाय असल्याचे झुकरबर्ग याने म्हटलेय. भारतात १३ कोटींपेक्षा जास्त लोक फेसबूकचा वापर करीत आहेत.

Leave a Comment