नव्या रूपातील ‘एर्टिगा’ बाजारपेठेत दाखल

ertiga
नवी दिल्ली: नवरात्र, दसरा आणि दिवाळीचा सणासुदीचा हंगाम आजारेसमोर ठेऊन मारुती सुझुकीने आपली ‘एर्टिगा’ ही कार संपूर्णपणे नव्या स्वरूपात आणि नव्या फीचर्ससह बाजारपेठेत आणली आहे. या गाडीच्या विविध मॉडेल्सची किंमत ५ लाख ९९ हजारापासून ते ९ लाख २५ हजारापर्यंत आहे.

नव्या ‘एर्टिगा’ला दोन नव्या बीज आणि निळ्यारंगात सादर करण्यात आले आहे. तसेच या कारच्या बाह्य आणि अंतर्भागात अनेक बदलही करण्यात आले आहेत. या कारच्या डिझेल मॉडेलच्या इंजिनमध्ये मध्ये एसएचव्हीएस मायक्रो हायब्रीड सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे नव्या ‘एर्टिगा’चे मायलेज अधिक असेल; अशी आशा आहे.

‘एर्टिगा’च्या समोरची जाळी, रेडीएटरची जाळी, बंपर यांना नवे रूप देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे धुक्यातही चांगली दृश्यमानता देणारे हेडलाईट्स बसविण्यात आले आहेत. कारला १० स्पोक-१५ इंचाचे एलॉय व्हील बसविण्यात आले असून पाठीमागच्या रचनेतही आकर्षकबदल करण्यात आले आहेत.
‘एर्टिगा’च्या केबिनमध्येही बदल करण्यात आले आहेत. ड्युएल टोन फिनिश्ड डॅशबोर्ड, तपकिरी रंगाचे सीट कव्हर यांचा त्यात समावेश आहे. चालक आणि पुढच्या प्रवाशाला एअरबॅगही या कारमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment