टीव्हीएसच्या स्टार सिटी प्लस’चे गोल्डन एडिशन लॉन्च

tvs
मुंबई : नुकतेच प्रसिद्ध कंपनी ‘टीव्हीएस मोटर्स’च्या टीव्हीएस स्टार सिटी प्लस या बाईकला एक वर्ष पूर्ण झाले असून एक वर्षाचे सेलिब्रेशन टीव्हीएसने अनोख्या पद्धतीने केले आहे. टीव्हीएसने ‘स्टार सिटी प्लस’च्या वर्षपूर्तीनिमित्त ‘स्पेशल गोल्ड एडिशन बाईक २०१५ स्टार सिटी प्लस’ लॉन्च केली आहे. अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि तंत्रज्ञानांचा समावेश असलेली ही बाईक तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा दावा टीव्हीएसने केला आहे.

पांढरा आणि सोनेरी रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये टीव्हीएसची ही नवी एडिशन उपलब्ध असणार आहे. बाईकचे सर्व डिझाईन्स सोनेरी रंगाचे असणार आहे. सोनेरी रंगामुळे ‘स्पेशल गोल्ड एडिशन बाईक २०१५ स्टार सिटी प्लस’चा लूक आकर्षक झाला आहे, असे अनेक बाईकप्रेमींचे मत आहे. आधीच्या मॉडेलचे सर्व फीचर्स या बाईकमध्ये आहेतच. मात्र, त्यासोबतच ट्यूबलेस टायर्स आणि यूएसबी मोबाईल चार्जरसारखे अत्याधुनिक फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.

याबाबत टीव्हीएस मोटर्स कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडंट के. एन. राधाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्पेशल गोल्ड एडिशन २०१५ स्टार सिटी प्लस’ बाईकला ‘स्टार सिटी प्लस’च्या पहिल्या वर्षपूर्तीदिनी लॉन्च करण्यात आले आहे. या बाईकच्या रुपाने भारतीय बाईकप्रेमींसाठी आम्ही नेहमीप्रमाणे टीव्हीएस समूहाकडून अनोखी भेट दिली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, हे मॉडेलही बाईकप्रेमींच्या पसंती उतरले.

Leave a Comment