पिटुकली कार, आकार लहान किंमत महान

peel
पील पी ५० ही जगातील सर्वात पिटुकली कार म्हणून ओळखली जाते. या कारची लांबी फक्त ५४ इंच आहे तर रूंदी आहे ४१ इंच. या कारला एकच हेडलाईट आणि १ दरवाजा आहे. विशेष म्हणजे तिचे उत्पादन १९६२ सालीच सुरू झाले होते मात्र दोन वर्षातच ते बंद केले गेले. त्यानंतर ते कांही काळाने पुन्हा सुरू झाले आहे.

या कारला एक अॅटोमॅटिक गिअर बॉक्स, इंडिपेंडंड सस्पेन्शन, व ऑल व्हील ब्रेकींग सारखी सुविधा आहे. १ इलेक्ट्रीक विंडस्क्रीन वायपर, विंडस्क्रीन वॉशर व लेदर सीट आहे. कारचे वजन ५९ किलो ते ११० किलो अशा रेंजमध्ये आहे. मनात आणले तर ही कार उचलून घेता येते, लिफ्टमध्ये ठेवता येते. पाच रंगात ती उपलब्ध आहे. त्यात काप्री ब्ल्यू, डेटोना व्हाईट, ड्रॅगन रेड, जॉयविले पर्पल आणि सनशाईन यलो या रंगांचा समावेश आहे. ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये येते. पेट्रोल कारचा टॉप स्पीड ४५ किमी प्रती तास तर इलेक्ट्रीकचा वेग ५० किमी प्रतितास आहे. १ लिटरमध्ये ती ५० किमी अंतर कापते.

ही कार आकाराने अगदी लहान असली तरी तिची किंमत मात्र महान आहे. या कारसाठी तब्बल १४ लाख रूपये मोजावे लागतात.

Leave a Comment