बीएमडब्ल्यूने भारतात लॉन्‍च केली एक्स५ एम आणि एक्स६ एम

bmw
चेन्‍नई- भारतीय बाजारात जर्मनीच्या ऑटोमोबाइल कंपनी बीएमडब्ल्यूने एक्स सीरीजच्‍या दोन नव्या एक्स५ एम आणि एक्स६ एम मॉडेल लॉन्‍च केल्या आहेत. बीएमडब्ल्यू एक्स५ एम या कारची किंमत १.५५ कोटी रूपये तर एक्स६ एम मॉडेलची किंमत १.६ कोटी रूपये आहे. या दोन्‍ही कार सीबीयू (कंप्‍लेटली बिल्‍ट यूटिलिटी) यूनिट आहे. या कारची डीलरशिप देशभरात बीएमडब्‍ल्‍यू उपलब्‍ध करून देणार आहे.

बाजारात बीएमडब्ल्यू एक्स५ एम आणि एक्स६ एम कार येताच हाय परफॉर्मस् स्‍पोर्ट्स कार सेगमेंटमध्‍ये एक प्रकारे नवीन परिमाण दिसून येईल, असे भारतातील बीएमडब्ल्यू ग्रुपचे अध्‍यक्ष फिलिप वॉन सार यांनी सांगितले. पॉवरफुल इंजिनसाठी बीएमडब्ल्यूची एक्स सीरीजची कार ओळखली जाते.

लक्झरी सोबत मोटोस्‍पोर्ट्सचे परिपूर्ण मिश्रण एम-सीरीजमध्‍ये करण्‍यात आले आहे. एक्स५ एम सीरीजमध्‍ये ड्रायव्हिंग आणि फीचर्सच्‍या बाबतीत दुस-या कार्सपेक्षा खुप पुढे आहे. तसेच एक्स६ एम कार देखील परफॉर्मस् आणि पॉवरच्‍या बाबतीत उत्‍कृष्‍ठ आहे.

Leave a Comment