महिंद्राची ‘मोजो’ दुचाकी बाजारात

mahindra
नवी दिल्ली – ‘महिंद्रा मोटारसायकल्स’ने दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली ‘मोजो’ मोटारसायकल सादर करून दुचाकींच्या बाजारपेठेत दमदार पदार्पण केले आहे.

काळा, पांढरा आणि लाल या तीन रंगात उपलब्ध असलेल्या या गाडीची किंमत १ लाख ५८ हजार रुपये आहे. ‘मोजो’चे हे स्वागत मूल्य असून दिवाळीनंतर त्यात वाढ करण्यात येईल; असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. स्पोर्ट्स बाईक प्रकारातील या गाडीचे इंजिन ३०० सीसी क्षमतेचे आहे.
मोजो बाजारपेठेत सादर करण्यात आघाडी घेऊन महिंद्राने बजाज केटीएम, होंडा आणि टिव्हीएससमोर आव्हान उभे केले आहे. विशेषत: पुढील वर्षी बाजारात येणाऱ्या ‘बजाज पल्सर सीएस ४००’ला त्यापूर्वीच बाजारात आलेल्या ‘मोजो’शी स्पर्धा करावी लागेल.

‘मोजो’ सध्या पुणे, मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथील १० वितरकांकडेच उपलब्ध आहे. यापुढील काळात ही गाडी इतर शहरात उपलब्ध करून देण्यात येईल. महिंद्राच्या वतीने लवकरच दुचाकीची आणखी काही मॉडेल्स बाजारपेठेत आणण्यात येतील; असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment