व्हॉट्स अॅप आणि गूगलचा करार

google
मुंबई: जाइंट सर्च इंजिन गूगलसोबत जगातील सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने कंटेट बॅकअपसाठी करार केला आहे. या अंतर्गत व्हॉट्सअॅपचा सर्व कंटेट जसे चॅट, व्हिडिओ आणि फोटोचे बॅकअप गूगल ड्राइव्हवर घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर जुने चॅट्स सुद्धा गूगल ड्राइव्हवरून रिस्टोर केले जावू शकेल.

गूगल नुसार, हे नवे फीचर आजपासून सुरू होणार आहे. मात्र सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी जवळपास एक महिना लागेल. कंपनीनुसार या फीचरमध्ये व्हॉट्स अॅप यूजरचे चॅट, व्हॉइस क्लिप, फोटो आणि व्हिडिओ ऑटोमॅटिकली त्याचा गूगल ड्राइव्हमध्ये बॅकअपच्या रुपात सेव्ह होईल. या फीचरची आणखी एक खास बाब म्हणजे आपण आपल्या नव्या फोनवर सुद्धा जुन्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्स अॅप कंटेट अवघ्या काही क्लिकवर रिस्टोर करू शकाल.

व्हॉट्स अॅपचे को-फाउंडर ब्रायन यांनी सांगितले की, व्हॉट्स अॅप बॅकअपसाठी गूगल ड्राइव्ह सर्वात सोपी ऑप्शन आहे. या सर्व्हिसमुळे लोकांना व्हॉट्सअॅप बॅकअप घेण्यासोबतच गूगल ड्राइव्हमुळे प्युअर अँड्रॉइडचा अनुभव घेता येईल.

Leave a Comment