आता मॉलमध्येही मिळणार रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ची उत्पादने

patanjali
नवी दिल्ली : नुकताच बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद‘ आणि किशोर बियाणींच्या ‘फ्युचर समूह‘ यांच्यात करार झाला असून, पतंजलीची उत्पादने फ्युचर समूहाच्या ‘बिग बझार‘ व इतर आऊटलेट्समध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

प्रॉक्टर अँड गॅम्बल, इमामी व ज्योती लॅब्ससारख्या मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांना पतंजली ट्रस्टची आयुर्वेदिक उत्पादने टक्कर देत असून सध्या पतंजलीचे वार्षिक उत्पन्न २५०० कोटी रुपये असून ट्रस्टचे मूल्यांकन तब्बल चौदा हजार कोटी रुपये आहे. येत्या पाच वर्षात पतंजली समूहाचे पाच ते दहा हजार कोटी रूपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. तसेच या करारमुळे फ्युचर समूहाच्या ग्राहक संख्येतदेखील एक कोटींची भर पडणार आहे.

सध्या पतंजलीची वैयक्तिक निगा आणि अन्न क्षेत्रातील सर्वच प्रकारची उत्पादने आहेत. त्यात साबण, शॅम्पू, दातांची निगा राखणारी उत्पादने, बाम, त्वचेची क्रीम्स, बिस्कीटे, तूप, ज्यूस, मध, पीठ, मोहरी तेल, मसाले, साखर आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे .लवकरच पतंजली इन्स्टंट नूडल्स सारखी उत्पादने बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment