
यू टेलिव्हेंचर्स ने कंपनी लवकरच हायएंड स्मार्टफोन आणत असल्याचे संकेत दिले असताना या फोनचे फिचर्स लिक झाले आहेत. कंपनीचे संस्थापक राहुल शर्मा यांनी यू यूरोपिया हा जगातील सर्वाधिक पॉवरफुल हाय एंड स्मार्टफोन असेल असे ट्विट कंपनी फोरमवर केले आहे. हा फोन बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही समजते.
यू युरोपिया जगातील पॉवरफुल स्मार्टफोन?
सप्टेंबरमध्ये कंपनीने यू युनिक स्मार्टफोन लाँच केला आहे. त्या पाठोपाठ हा नवीन पॉवरफुल फोन येत असून त्याचे नामकरण यू ५५० असे केले जाईल असेही सांगितले जात आहे. गीकबेंच व इंडियन इंपोर्ट एक्स्पोर्ट मेनिपेस्ट साईटवर हा फोन लिस्ट केला गेला आहे. त्यातील माहितीनुसार हाच हायएंड स्मार्टफोन असावा असे संकेत मिळत आहेत. या फोनसाठी ५.२ इंची फुल एचडी स्क्रिन, ४ जीबी रॅम, ५.१.१ लॉलीपॉप बेस्ड सायनोजेन ओएस, ड्यूअल सिम, मायक्रो एसडी सपोर्ट अशी फिचर्स असतील असा अंदाज असून हा फोन २० हजार रूपयांच्या दरम्यान असेल असेही समजते.
