चीनची फोटॉन चाकणमध्ये बनविणार प्रवासी गाड्या

foton
तीन वर्षांपूर्वीच भारतात आगमन करत असल्याची घोषणा केलेल्या चीनच्या बलाढ्य फोटॉन या ट्रक उत्पादक कंपनीने अखेर पुण्याजवळ चाकण येथे प्रवासी कार उत्पादन आणि निर्यात उद्योग सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. ही कंपनी बेकी फोटॉन या नावाने जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्याने प्रिमियम स्पोर्टस युटिलीटी व्हेईकल्स (एसयूव्ही) नवीन ब्रँड बोगवार्ड नावाने बाजारात आणेल असे समजते.

एका अहवालानुसार भारतातील पॅसेंजर व्हेईकल उद्योग या दशकात जगातील तीन नंबरचा मोठा उद्योग असेल. त्यामुळे फोटॉनने या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे. फोटॉन आपला ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी भारतात या गाड्यांचे उत्पादन आणि निर्यात असे प्रकल्प उभारले गेले आहेत. जगात एसयूव्हीची मागणी वाढत चालली आहे. दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका व मध्यपूर्वेत या गाड्या निर्यात केल्या जाणार आहेत. या कारखान्यात प्रथम व्हॅन तयार केल्या जाणार असून त्या फोर्समोटर्सच्या टेंपो ट्रॅव्हलरचे प्रिमियम व्हर्जन असेल असे समजते. सुरवातीला २०१६-१७ मध्ये या गाड्या पुण्याच्या कारखान्यात असेंबल केल्या जातील आणि २०१८ पासून लक्झरी कार उत्पादन सुरू होईल. त्यांच्या किमती १५ ते २० लाखांच्या दरम्यान असतील असेही समजते.

Leave a Comment