जगातील सर्वाधिक छोटी व्यावसायिक फ्लाईट

scotland
विमानांची व्यावसायिक उड्डाणे प्रचंड प्रमाणात वाढली आहेत.अगदी कमी अंतरांसाठीही हल्ली व्यावसायिक फ्लाईटस उड्डाणे करत आहेत. मात्र स्कॉटलंडमधील आर्कने बेटावरील वेस्ट रे व पापा पेस्ट रे ही व्यावसायिक फ्लाईट जगातील सर्वात कमी वेळेचे फ्लाईट आहे. या उड्डाणासाठी हवा स्वच्छ असेल तर केवळ ४७ सेकंदे लागतात. हवा खराब असेल तर दोन मिनिटे लागतात. विशेष म्हणजे १९६० पासून या फ्लाईट सुरू आहेत.

या छोट्याशा प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला २ हजार रूपये तिकीट पडते. विमानात चहा पाणी कांहीच दिले जात नाही कारण तेवढा वेळच हाताशी नसतो. या सेवेचा उपयोग करणारे बहुतेक प्रवासी शिक्षण, आरोग्य सेवा क्षेत्रातले असतात अथवा आजारी रूग्ण असतात. २०११ पासून या बेटांवर पर्यटकांसाठीही फ्लाईट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात आसपासची बेटेही दाखविली जातात. पापा रे अवघ्या ७० लोकवस्तीचे बेट असले तरी पुराणतत्त्व विभागाच्या म्हणण्यानुसार ते महत्त्वाचे बेट आहे. या छोट्याशा बेटावर ६० जागी उत्खननाने काम सुरू असल्याचेही समजते. आर्कने द्विपसमूह हा स्कॉटलंडमधील पाच हजार वर्षांचा जुना द्विपसमुह आहे.

Leave a Comment