मायक्रोमॅक्सच्या यूफोरियाच्या किंमतीत घट

micromax
मुंबई: मायक्रोमॅक्सने YU युफोरिया या मिडरेंज स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली असून तसेच अँड्रॉईड ५.० लॉलिपॉपही या स्मार्टफोनमध्ये आता अपडेट होणार आहे. याआधी हा स्मार्टफोन सायनोजन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित होता. या स्मार्टफोनची लाँचिंगवेळी किंमत ६९९९ रु. होती. आता याची किंमत ६४९९ रु. असणार आहे. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच या स्मार्टफोनसाठी आता नोंदणी करण्याचीही गरज नाही.

Leave a Comment