नासाने प्रसिद्ध केले ५० वर्षांपूर्वीच्या चंद्राचे ८ हजार ४०० फोटो

nasa
न्यूयॉर्क : ८ हजार ४०० हून अधिक फोटो फ्लिकर या पिक्चर वेबसाईटवर नासा या अंतराळ संशोधन संस्थेने प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंचे दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे हे फोटो १९६९ ते १९७५ या दरम्यानच्या नासाच्या ‘अपोलो मून मिशन’चे आहेत आणि दुसरे म्हणजे आतापर्यंत यातील अनेक फोटो तुम्ही पाहिली असाल, मात्र एवढ्या स्पष्टपणे नसतील. हे सर्व फोटो हाय-रिझॉल्युशनचे आहेत.

५० वर्षांपूर्वीचा चंद्र लोकांना या फोटोंमुळे पाहता येणार आहे. तब्बल १८०० डीपीआय (डॉट पर इंच) या क्वालिटीचे हे फोटो आहेत. नासाच्या मोहिमेदरम्यान त्यांच्या अंतराळविरांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलेले हे फोटो अंतराळ क्षेत्रातील संशोधनासाठीही महत्त्वाचे मानले जात आहेत.

हे फोटो ४०-५० वर्षांपूर्वीचे स्कॅन केले आहेत. याआधीही यातील काही फोटो प्रसिद्ध केले गेले होते. मात्र, एवढ्या हाय क्वालिटीमध्ये ते फोटो नव्हते. ‘नासा’चे ८४०० फोटो पाहण्यासाठी क्लिक करा : https://www.flickr.com/photos/projectapolloarchive/albums

Leave a Comment