गृहकर्जदरात ‘एचडीएफसी’कडून ०.२५ टक्के कपात

hdfc
नवी दिल्ली – गृहकर्जाच्या दरात एचडीएफसी बँकेने कपात केली असून किमान कर्जदर (बेस लेंडिंग रेट) ०.२५ टक्‍क्‍यांनी एचडीएफसीने कमी करून ९.६५ टक्के इतका केल्यामुळे आता ईएमआय कमी होणार असून एचडीएफसीच्या गृहकर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. ७ ऑक्टोबरपासून हे दर लागू होतील.

आता एचडीएफसीच्या नव्या ग्राहकांना गृहकर्जाचा दर ९.६५ टक्के तर महिलांसाठी हा दर ९.६० टक्के करण्यात आला आहे. सध्या हा दर ९.९ टक्के व ९.८५ टक्के आहे. हे दर एनआरआय व पीआयओ कार्ड होल्डर्सनादेखील लागू होणार आहेत. एचडीएफसीने मुदत ठेवींवरील व्याजदरात नुकतीच कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यातील निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) किमान व्याजदरात ०.४० टक्क्यांची सर्वाधिक कपात केली होती. एसबीआयने बेस रेट ९.७० टक्क्यांवरून कमी करून ९.३० टक्के करण्यात आला आहे.

Leave a Comment