
नवी दिल्ली – आज (रविवार) सकाळी अवैध पद्धतीने आणलेल्या १८२ आयफोन्ससह सात जणांना दिल्लीतील विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
१८२ आयफोन्ससह ७ जणांना दिल्लीत अटक
या महिन्याच्या अखेरीला भारतात आयफोन ६ एस आणि ६ एस प्लस हे दोन स्मार्टफोन सादर होणार आहेत. पण त्यापूर्वीच हे सर्वजण हे फोन भारतात घेऊन आले होते. हे सर्वजण आज भारतात हाँगकाँग आणि सिंगापूर येथून दाखल झाले. आयफोन ६ एस आणि ६ एस प्लस हे स्मार्टफोन भारतात अॅपल कंपनी १६ ऑक्टोबरला सादर करणार आहे. कंपनीने अद्याप भारतीय बाजारातील याची किंमत प्रसिद्ध केलेली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे युवक भारतात सादर होण्यापूर्वी आयफोन्स घेऊन आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून १८२ स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत. यातील काही युवकांनी लाच देण्याचाही प्रयत्न केला.
