चक्क झुकेरबर्गवर फसवणुकीचा खटला

mark
सॅन होजे- एका मालमत्ता विकासकाने फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्यावर चक्क फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने देखील सुनावणी दरम्यान या प्रकरणात फसवणूक झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आल्याने याचिका दाखल करुन घेतली आहे. तसेच झुकेरबर्गला याप्रकरणी दोषी ठरवले असून या खटल्याची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

कॅलिफोर्नियाच्या पालो अल्टोमध्ये मिर्सिया वोस्केरिसियन यांच्याशी त्यांच्या घराशेजारील एक जागा आणि घर खरेदी करण्याचा झुकरबर्ग याने २०१२ मध्ये करार केला होता. या करारात झुकेरबर्ग यांना ४० टक्के सुट दिलाचा दावा मिर्सिया यांनी केला आहे. त्याबद्दल्यात सिलिकॉन वॅलीमध्ये आपल्या ओळखीने व्यवसाय वाढवण्यास मदत करु, असे झुकेरबर्ग याने सांगितले होते. परंतु असे झाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप मिर्सिया यांनी केला आहे. हा करार ११ कोटी रुपयांना करण्यात आला होता.

झुकेरबर्ग प्राथमिक सुनावणीत दोषी आढळल्यामुळे खटला रद्द करण्याची झुकेरबर्ग याची मागणी कॅलिफोर्नियाच्या न्यायमूर्ती पॅट्रिसिया लुकास यांनी फेटाळून लावली. तोंडी आश्वासने स्पष्ट व बाध्य नाहीत, असा दावा झुकेरबर्गच्या वकील पॅट्रिक गन यांनी केला. मात्र मिर्सिया आणि झुकेरबर्ग या दोघांनी एकमेकांना पाठवलेले ई-मेल मर्सियांच्या वकिलांनी दाखवले. त्यातून तोंडी आश्वासनाला पुष्टी मिळत असल्याने झुकेरबर्ग अडचणीत सापडला आहे.

Leave a Comment