लवकरच तुमच्या मोबाईलमध्ये येणार ‘पॅनिक बटन’

panic
नवी दिल्ली : सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारने पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.

मेनका गांधी विद्यार्थ्यांच्या समस्यांशी निगडीत मुद्यावर बोलताना आता सगळ्याच फोन्समध्ये एक पॅनिक बटण असेल, जे बटन जीपीएसशी जोडलेले असेल. फोन निर्मात्यांशी आमची चर्चा सुरु असून हा प्रस्तावाची येत्या काही महिन्यांमध्ये अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

उपयोगात येणाऱ्या अॅप अडचणीच्यावेळी वापरण्यासाठी जास्त वेळ लागतो. फोनमध्ये एकच बटन असेल तर अडीअडचणीच्या वेळी खूप सोईस्कर ठरू शकते, असे प्रशासनाला वाटते आहे. यावर लावण्यात आलेले पॅनिक बटन काही नंबर्सवर एक एसएमएस पाठवेल. यामध्ये बटन दाबणाऱ्या व्यक्तीची स्थिती दाखवणारी माहिती पाठवली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Comment