सप्टेंबरमध्ये ४१ विविध स्मार्टफोन्सची बाजारात एन्ट्री

smartphon
वर्ल्ड मोबाईल मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सनी धुमाकूळ घातला असताना भारतीय बाजारासाठीही सप्टेंबर २०१५ बूम पिरीयड राहिला आहे. या एका महिन्यात दिग्गज कंपन्यांसह अनेक लहान मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांचे मिळून तब्बल ४१ स्मार्टफोन्स भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यात महागड्या आयफोन्सपासून स्वस्तातल्या ईटेक्स क्लाऊड व्ही पर्यंत सर्व दरांतील फोन्सचा समावेश आहे.

सप्टेंबरमध्ये अॅपल, सॅमसंग, सोनी, एचटीसी, आसुस, इंटेक्स, लेनोवो, आयबॉल, लावा, ओप्पो, इनफोकस, मायक्रोमॅक्स, जोलो, अशा अनेक दिग्गज कंपन्यांनी त्यांची मॉडेल्स सादर केली आहेत. मात्र भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात महागबरोबरच मिडलरेंज आणि लो कॉस्ट अशा तर्हे्च्या मॉडेल्सचा समावेश केला आहे. त्यात १० हजार ते १५ हजारांपर्यंतच्या रेंजचा वाटा अधिक आहे. तसेच मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास स्पार्कर अवघ्या ३९९९ रूपयांत तर त्यापुढे जाऊन इंटेक्स क्लाऊड व्ही ३५४४ रूपयांत उपलब्ध करून दिला गेला आहे. त्या तुलनेत आयफोन ६एस १६ जीबी मॉडेल ७२ हजार तर १२८ जीबी मॉडेल ९२ हजार रूपयांत मिळणार आहे.

1 thought on “सप्टेंबरमध्ये ४१ विविध स्मार्टफोन्सची बाजारात एन्ट्री”

Leave a Comment