पृथ्वीच्या भवितव्याचा वेध घेण्यासाठी चीनचा ‘मॅजिक क्यूब’

Majic-Cube
बीजिंग: पृथ्वीवर आगामी काळात घडू शकणाऱ्या हवामान आणि जीवशास्त्रीय बदलांचा अंदाज घेऊन पृथ्वीच्या भवितव्याचा वेध घेण्यासाठी
चीनने तब्बल ११ मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च करून ‘मॅजिक क्यूब’ या महासंगणकाची निर्मिती केली आहे.

दोन मजली इमारतीएवढा आकार असलेल्या या प्रचंड क्षमतेच्या संगणकाचा वापर करून पुढील शेकडोच नव्हे; तर हजारो वर्षात पृथ्वीच्या जीवसृष्टी आणि हवामानात काय बदल होऊ शकतात; याचा वेध घेणे शक्य होईल;असा चिनी शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेशी संलग्न असलेल्या अनेक विज्ञान संस्थांनी मिळून हा महासंगणक विकसित केला असून त्याची संगणन क्षमता १ पेटाफ्लॅप एवढी आहे. त्यामध्ये ५ पीबी एवढा प्रचंड माहितीचा साठा करणे शक्य आहे. चीनच्या सर्वात मोठया १० महासंगणकांपैकी एक आहे.

या संगणकाच्या सहाय्याने हवामान, सागरी प्रवाह, भूस्तरावरील हालचाली, जीवशास्त्रीय बदल यांचा वेध घेऊ शकणार आहे. अंतराळातील वैश्विक किरणोत्सर्ग, सूर्यकिरण, वाऱ्याचे प्रवाह याचाही अभ्यास या संगणकाद्वारे करता येईल. किमान पुढील ३० वर्षाच्या हवामान बदलाचा अंदाज कमी करून हरीत वायूंचे आणि कर्ब वायूचे प्रदूषण कमी करण्यात हा महासंगणक मोठी भूमिका निभावेल; असा विश्वास चीनच्या शास्त्रज्ञांना आहे.

Leave a Comment