मुंबईत येणार मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला

satya-nadella
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर जगविख्यात तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला येणार आहेत. मुंबईतील एका अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनीच्या कार्यक्रमात येत्या नोव्हेंबर महिन्यात नडेला उपस्थिती लावणार आहेत.

ते यावेळी मायक्रोसॉफ्टचे महत्त्वाचे कस्टमर्स, पार्टनर्स आणि डेव्हलपर्सशी संवाद साधणार आहेत. मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विराजमान झाल्यानंतर सत्या नडेला यांची ही दुसरी भारतभेट असणार आहे. याआधी ते सप्टेंबर २०१४ मध्ये भारतात आले होते.

सत्या नडेला भविष्यात ई–विश्वातील वाटचाल कशी असेल, यावर मत मांडणार आहेत. शिवाय, भारतातील मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वाच्या कस्टमर्सनाही नडेला भेटतील आणि ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Leave a Comment