एअरटेल ४जी ची जाहिराती थांबविण्याचे आदेश

4g
नवी दिल्ली : एअरटेल या टेलिकॉम सर्व्हिस देणाऱ्या कंपनीला अॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने टीव्हीवर दिशाभूल करणारी जाहिरात दाखवल्याप्रकरणी दणका दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न एअरटेलने ४जी च्या जाहिरातीमधून केल्याचा ठपका ठेवून नोटीस पाठवली आहे.

एका मुलीने या जाहिरातीमधून लोकांना जर तुमच्या नेटवर्क सर्व्हिसचा स्पीड एअरटेल ४जी पेक्षा अधिक असेल, तर एअरटेल तुम्हाला लाईफटाईम मोबाईल बिल फ्री देईल. शिवाय, या जाहिरातीमधून असेही आव्हान दिलं आहे की, जर इतर ऑपरेटरचा मोबाईल इंटरनेट एअरटेल ४जी हून अधिक वेगवान असेल, तर एअरटेल कंपनी लाईफटाईम मोबाईल बिल फ्री देईल. ही जाहिरात टीव्हीवर प्रसिद्ध करताना कोणतेही डिस्क्लेमर न दिल्यामुळे या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

एअरटेलला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी अॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने नोटीस पाठवली आहे. शिवाय, ही जाहिरात मागे घेण्याचेही आदेश दिले आहेत. अॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या नोटिशीनुसार, ७ ऑक्टोबरच्या आत ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश एअरटेलला देण्यात आले आहेत.

Leave a Comment