अनफ्रेंड केल्यास गोत्यात याल !

facebook
लंडन : फेसबुकवर सतत एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ टॅग करणारे अनेक जण असतात. कधी-कधी चिडून आपण अशा काही जणांना अनफ्रेंडही करतो. मात्र, आता आपल्याच ऑफिसमधील सहका-याला अनफ्रेंड केल्यास कार्यालयीन छळवणूक केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो. असा निर्वाळा लंडनमधील एका कोर्टाने दिला आहे. लंडनमधील एका इस्टेट एजंटच्या ऑफिसमधील एका महिला सहका-याने आपल्या पुरुष सहका-याला अनफ्रेंड केले. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. अशाप्रकारे अनफ्रेंड केल्याने आपल्या त्रास झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने कोर्टात केल्यामुळे कोर्टाने त्यांच्या बाजूने याबाबत निर्णय दिला. त्याचवेळी सुनावणी दरम्यान कोर्टाने अशाप्रकारचा निर्वाळा दिला. लंडनमधील या निर्णयाची मात्र सगळीकडेच जोरदार चर्चा आहे.

Leave a Comment