विवो वाय सिरीज २७ एल भारतात सादर

vivo
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी विवो ने त्यांच्या वाय सिरीजचा विस्तार करताना विवो वाय २७ एल स्मार्टफोन भारतात नुकताच सादर केला आहे. फोनची अधिकृत किंमत कंपनीने जाहीर केलेली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार हा फोन १२९९० रूपयांत मिळेल असे समजते.

या स्मार्टफोनसाठी ४.७ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, ड्युल सिम, ८ एमपी चा रियर तर ५ एम.पीचा फ्रंट कॅमेरा, १ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड किटकॅट बेस्ड फनटच २.० ऑपरेटिंग सिस्टीम, नाईट, पॅनोरमा, बोके, फेस ब्युटी मोड अशी फिचर्स दिली गेली आहेत. हा फोन फोर जी, एलटीआय, ब्ल्यूटूथ, वायफाय, जीपीएसला सपोर्ट करतो. फोनचे वजन आहे १३७ ग्रॅम.

Leave a Comment