५० रूपयांच्या नाण्याला दीड लाखांत मागणी

50-rs
खास महिला वर्षामिमित्त रिझर्व्ह बँकेने जारी केलेले पण चलनात न आलेले ५० रूपयांचे नाणे दीड लाख रूपयांना खरेदी करण्याची तयारी नाणे संग्राहकांनी केली आहे.१९७५ साली पाडले गेलेले हे नाणे गुजराथच्या राजकोट येथील देवजीभाई गोएल यांच्या संग्रहात आहे. गोयल यांच्याकडे दुर्मिळ नाण्यांचा मोठा संग्रह आहे. त्यात २५ वर्षांपूर्वीचे १० रूपयाचे नाणेही आहे.

गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार १९७५ साली रिझर्व्ह बँकेने १० व ५० रूपयांच्या नाण्याचा सेट जारी केला होता. महिला वर्षानिमित्त ही नाणी पाडली गेली होती. रिझर्व्ह बँक कांही विशेष प्रसंगाने पाडलेली नाणी चलनात आणत नाही. ही नाणी याच सेटमधील आहेत. चांदी व तांबे मिश्रधातूपासून हे ५० रूपयांचे नाणे बनले आहे. त्याचे वजन ३३ ग्रॅम, व्यास १ इंचाचा आहे. १० रूपयांच्या नाण्याचे वजन २५ ग्रॅम आहे. गोयल यांनी ही नाणी रिझर्व्ह बँकेकडून रितसर अर्ज करून २५० रूपयांत खरेदी केली गेली होती.

Leave a Comment