मोदींचे अमेरिकन उद्योजकांना आवाहन; भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करा

modi
वॉशिंग्टन – अमेरिकेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. पंतप्रधानांनी उद्योजक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारतामधील उद्योग धंद्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असे आवाहन केली.

भारतातील उद्योग आणि व्यापाराचे वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे तेव्हा अमेरिकेतील उद्योजकांना भारतात गुंतवणूक करावी असे ते म्हणाले. स्टार्ट अप क्षेत्रात उद्योजकांनी स्वारस्य दाखवले असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरहून सांगितले. उद्योगाला पोषक वातावरण भारतात तयार केले जात असल्याच्या प्रयत्नांना उद्योजकांनी दाद दिली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आरोग्य, कृषी, वीमा या क्षेत्रात भारतात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment