इंद्रा नूयी जागतिक लीडरशीप पुरस्कारा’ ने सन्मानित

indra-nooyi
वॉश्गिंटन : यूएस-इंडिया बिजनेस काऊंसीलचा (यूएसआयबीसी) २०१५ चा जागतिक लीडरशीप पुरस्कार जगातील अग्रगण्य समजल्या जाणा-या पेप्सीको कंपनीच्या प्रमुख इंद्रा नूयी यांना प्रदान करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत त्यांनी केलेले उत्कृष्ट काम आणि महिला म्हणून त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्यासह एचटी ग्रुपच्य्या कार्याध्यक्षा शोभना भरतिया यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण यूएसबीच्या एका आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडेन, परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, असे इंद्रा नूयी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment