इस्रोच्या मंगळयानाची वर्ष पूर्ती

isro
मागील वर्षी २४ सप्टेंबर २०१४ रोजी जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या मार्स ऑर्बिटर मिशनला (मॉम) अर्थात मंगळयान अवकाशात झेप घेतली होती. या यानाने या वर्षभरात रेड प्लॅनेटभोवती आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

इस्त्रोच्या माध्यमातून मागील वर्षी २४ सप्टेंबरला मंगळयान अवकाशात यशस्वीपणे झेपावल्यानंतर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. मंगळावर जाणारे आपले हे यान जगातील चौथे यशस्वी यान ठरले आहे. यापुर्वी सोव्हीएत स्पेस प्रोग्रॅम, नासा आणि युरोपिएन स्पेस एजन्सी यांचा नंबर लागतो.

या मोहिमेमुळे भारत मंगळ ग्रहावर पोहोचणारा अशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. सर्वात म्हहत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच प्रयत्नात ही मोहिम यशस्वी करून दाखविल्याने सर्व जागाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे.

Leave a Comment