कार छोटी कर्तबगारी मोठी

gem-e4
अमेरिकन ऑटो कंपनी जेमने त्यांची जेम ई ४ ही इलेक्ट्रीक कार सादर केली असून ही कार दिसायला अगदी पिटुकली असली तरी तिची कामगिरी मात्र लक्षणीय असल्याचा दावा केला आहे. चार जण आरामात जाऊ शकतील अशा या कारची लांबी साधारण १० फुट, उंची ६ फूट आणि रूंदी साडेचार फूटांच्या दरम्यान आहे. अमेरिकन बाजारात तिची किमत ७ लाख रूपयांच्या दरम्यान आहे.

जेम ई ४ छोट्या प्रवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. तिला ४ हॉर्सपॉवरची इलेक्ट्रीक मोटर बसविली गेली आहे. इंजिन एकदा चार्ज केले की ५० किमीचे अंतर सहजी पार करू शकते. कारचा टॉप स्पीड ४० किमी ताशी आहे. भारतीय बाजारात ही कार छोट्या अंतरांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे सांगितले जात आहे. साधारण रिक्षाच्या खर्चात यातून चार जण आरामात प्रवास करू शकणार आहेत.

Leave a Comment