बँक एटीएममधून ५० रू.नोटाही मिळणार

atm
थोड्याच दिवसांत बँकांच्या एटीएममधून ग्राहकांना ५० रूपयांचा नोटाही मिळू लागणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य लोकांना छोट्या रकमेच्या नोटा मिळताना येत असलेल्या अडचणींचा विचार करून एटीएममधून ५० रूपयांच्या नोटाही देण्याचे आदेश बॅकाना दिले आहेत. कांही बँकांनी ५० रूपयांच्या नोटा एटीएममध्ये भरण्याचे काम सुरू केले असले तरी सर्व एटीएममधून या नोटा मिळण्यासाठी कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण त्यासाठी बँकांना एटीएममध्ये नोटा भरण्याच्या सिस्टीममध्ये बदल करावा लागणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार एटीएम मध्ये दोन प्रकारच्या नोटा एकावेळी भराव्या लागतात. म्हणजे १ हजाराच्या नोटांसोबत ५०० च्या ५०० च्या नोटांसोबत १०० रूपयांच्या नोटा भराव्या लागतात. आता १०० रूपयाच्या नोटांसोबत ५० रूपयांच्या नोटा भराव्या लागतील. वास्तविक ऑगस्ट २०१३ मध्येच रिझर्व्ह बँकेने एटीएममधून १०, २० व ५० रूपयांच्या नोटा भरण्याचे आदेश बँकांना दिले होते मात्र त्यावेळी बँकांनी अडचणींचा पाढा वाचून हे शक्य होणार नसल्याचे प्रतिपादन केले होते.

Leave a Comment