
झिरोडियन कॉम्प्युटर सिक्युरिटी फर्मने मंगळवारी जो हॅकर अॅपलची आयओएस नाईन हॅक करण्याची आयडिया शोधून काढेल त्याला १० लाख डॉलर्सचे इनाम देण्यात येईल असे जाहीर केले आहे. फ्रेंच ऑनलाईन सिक्युरिटी तज्ञ बेक्रर यांनी यूएसमध्ये झिरोडियमची स्थापना केली आहे. ही कंपनी सरकारी तसेच कार्पोरेट कंपन्यांना संस्थांना ऑनलाईन सुरक्षा मजबूत करण्यासाठी मदत करते.
१० लाख डॉलर्स हवेत मग आयओएस नाईन हॅक करा
कंपनीने हॅक बक्षीस योजना जाहीर करताना म्हटले आहे की तीन जण अथवा त्यांचा गट बक्षीसासाठी पात्र ठरणार आहे. त्यासाठी आयफोन अथवा आयपॅडवर आयओएस नाईन हॅक करण्यात त्यांना यश मिळवावे लागेल. त्यासाठी ऑनलाईन स्टेटमेंट जारी केले गेले असून त्यानुसार बक्षीस मिळविण्यासाठी हॅकरना वेबपेज अथवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आयओएस नाईन सुरक्षा भेदून आयफोन अथवा आयपॅडवर अॅप इन्स्टॉल करावे लागणार आहे. त्यासाठी ३१ आक्टोबर ही शेवटची मुदत आहे.
बेक्रर यांच्या म्हणण्यानुसार बाजारातील अन्य ओएसपेक्षा अॅपलची आयओएस नाईन अधिक सुरक्षित आहे मात्र याचा अर्थ ती हॅक होणारच नाही असे नाही. मात्र हॅकर्ससाठी हे काम खर्चिक आणि अवघड नक्कीच आहे. त्यासाठीच हे बक्षीस जाहीर केले गेले आहे. यामुळे या यंत्रणेतील त्रुटी समजतील व त्या दूर करता येतील.
