टेलीनॉर देणार कॉल ड्राॅपची भरपाई

tekenor
टेलिफोन ऑपरेटर कंपनी युनिनॉरने यापुढे कंपनी टेलीनॉर ब्रँडनेमखाली सेवा देणार असल्याचे जाहीर करतानाच ग्राहकांसाठी कॉल ड्राॅप भरपाई देणार असल्याचीही घोषणा केली आहे. भारतातील सर्वाधिक परवडणारी सेवा पुरवठादार कंपनी म्हणून काम करण्यासाठी १०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याचेही कंपनीचे सीईओ विवेक सूद यांनी सांगितले.

मूळची नॉर्वेची कंपनी टेलीनॉरने भारतात युनिटेक वायरलेस कंपनीबरोबर सहकार्य करून आपली सेवा सुरू केली होती. आता युनिटेक या भागीदारीतून पूर्णपणे बाहेर पडली आहे. सीईओ विवेक सूद म्हणाले, आमच्या भारतीय ग्राहकांशी आम्ही उत्तम आणि अॅफोर्डबल सेवा देण्याचा वायदा केला आहे. त्यानुसार कॉल ड्राॅप ही आमची जबाबदारी आहे. सबसे सस्ता नेटवर्क म्हणून आमची ख्याती आहेच त्यात कॉल ड्राॅपसारखे फायदे ग्राहकाला दिले जात आहेत कारण गुणवत्तापूर्ण सेवा ही आमची खासियत आहे. कॉल ड्राॅप भरपाई लोकल, आयएसडी आणि एसटीडी अशा सर्व कॉलसाठी दिली जाणार आहे.

कंपनीकडे सध्या सात विभागांसाठी सेवा परवाना आहे. मात्र पैकी आंध्र, महाराष्ट्र, गुजराथ, उत्तर प्रदेश (पूर्व आणि पश्चिम) बिहार राज्यातच कंपनी सेवा देत आहे. आसाममध्ये लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे.

Leave a Comment