
नवी दिल्ली – अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डने आपली न्यू जनरेशन फोर्ड फिगो हॅचबॅक आज (बुधवार ) लॉन्च केली आहे. राजधानी दिल्लीत एक्स-शोरूममध्ये या कारची किंमत ४.२९ एवढी आहे. नव्या फिगो हॅचबॅकचे डिजाइन, इंजिन आणि फीचर्स जवळ-जवळ फिगो एस्पाईर सारखेच असून या कारमध्ये ६ एअरबॅग आणि डुअल-क्लच ऑटोमेटिक ट्रांसमिशनची सुविधा देण्यात आली आहे.
फोर्डने लॉन्च केली नव्या रुपात फिगो हॅचबॅक
फिगो एस्पाईर सारखेच नव्या न्यू जनरेशन फोर्ड फिगो हॅचबॅकमध्ये कंपनीचा सिग्नेचर ग्रिल लावला गेला आहे. त्याचबरोबर स्वेप्टब्लॅक हेड-लाइट आणि बॉडी कलर बंपरसारखे फीचर्सचा समावेश केला गेला आहे.
नव्या न्यू जनरेशन फोर्ड फिगो हॅचबॅकच्या किंमती (एक्स-शोरूम, दिल्ली)
पेट्रोल
1.2-litre Base: 4.29 लाख रुपये
1.2-litre Ambiente: 4.56 लाख रुपये
1.2-litre Trend: 5 लाख रुपये
1.2-litre Trend+: 5.25 लाख रुपये
1.2-litre Titanium: 5.75 लाख रुपये
1.2-litre Titanium+: 6.40 लाख रुपये
1.5-litre (AT) Titanium: 6.91 लाख रुपये
डिझेल
1.5-litre Base: 5.29 लाख रुपये
1.5-litre Ambiente: 5.62 लाख रुपये
1.5-litre Trend: 5.97 लाख रुपये
1.5-litre Trend+: 6.22 लाख रुपये
1.5-litre Titanium: 6.72 लाख रुपये
1.5-litre Titanium+: 7.40 लाख रुपये
