
फ्रान्सचे भूषण असलेला आयफेल टॉवर रविवारी अचानक संशयास्पद व्यकतीच्या हालचालींमुळे बंद करण्यात आला.रविवारी या स्थळी भेट देण्यासांठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र रविवारी अचानक एक मोठी बॅग घेऊन टॉवरवर जाऊ पाहणार्या व्यक्तीमुळे सुरक्षा अलार्म वाजल्याने एकच गडबड उडाली आणि सुरक्षा रक्षकांनी टॉवरवरील सर्व पर्यटकांना खाली उतरवून टॉवर बंद केला असे समजते.
हल्ल्याच्या धास्तीने आयफेल टॉवर बंद
सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली व तातडीने अनेक हेलिकॉप्टर्स आयफेल टॉवरच्या भोवती कांही विपरित प्रकार घडत नाही ना हे पाहण्यासाठी गस्त घालू लागली. यापूर्वीच अल कायदा आणि इसिसने आयफेल टॉवर उडवून देण्याचा इशारा दिला आहे. फ्रान्सच्या शार्ली एब्दो वर हल्ला झाल्यापासूनच आयफेल टॉवरची सुरक्षाही वाढविली गेली आहे.
