जगातला सर्वात छोटा फोरजी स्मार्टफोन- वीर

veer
स्मार्टफोन उत्पादक कंपन्या मोठ्या स्क्रीनचे, डिस्प्ले क्वालिटी अधिक चांगली देणारे स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या धांदलीत असताना एचपी कंपनीने जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन वीर नावाने बाजारात आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन वास्तविक २०११ मध्येच तयार झाला होता. सध्या अमेरिकी मार्केटमध्ये तो १०० डॉलर्समध्ये उपलब्ध असून भारतात तो कधी येणार व किती किंमतीला विकला जाणार याबाबत अजून कोणताही खुलासा केला गेलेला नाही.

या स्मार्टफोनसाठी २.६ इंचाचा टच डिस्प्ले दिला गेला आहे. हा फोन फोरजी नेटवर्कला सपोर्ट करतो तसेच वायफाय, ब्ल्यू टूथ, एजीपीएस, मायक्रो यूएसबी व्ही २.० अशीही कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स त्याला आहेत. ८ जीबी इंटरनल मेमरी,५ एमपीचा रियर कॅमेरा, त्याला दिला गेला आहे तसेच व्हीडीओ रेकॉर्डिंग सुविधाही आहे. फोनसाठी ३०० तास जास्त स्टँडबाय टाईम आणि ५ तासांचा टॉकटाईमही दिला गेला आहे. काळा आणि पांढरा अशा दोन रंगात तो उपलब्ध असून त्याचे वजन आहे १०३ ग्रॅम.

Leave a Comment