रेनॉल्टच्या ‘क्वीड’ची बुकिंग सुरु!

kwid
नवी दिल्ली : एसयूवी सारखी असणाऱ्या क्वीड या कारची बुकिंग फ्रान्समधील कार कंपनी रेनॉल्टने सुरु केली आहे. या कारची बुकिंग सुरु आजपासून करण्यात आली आहे. रेनॉल्ट कंपनीने लॉन्चिंगआधीच डिलर्सपर्यंत कार पोहोचवण्याचे काम सुरु केले आहे.

३ ते ४ लाख रुपयांच्या दरम्यान रेनॉल्टच्या क्वीड कारची किंमत असणार आहे. ७९९ सीसीचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन क्विडमध्ये लावले असल्याची माहिती रेनॉल्टच्या सीईओने दिली आहे. त्याचबरोबर ही कार ताशी २५.१७ किमीचा मायलेज देण्याचा दावाही रेनॉल्टकडून करण्यात आला आहे.

रेनॉल्टच्या ट्रेडमार्क डिझाईनची ग्रील, रेक्टँग्युलर हेडलँपही या कारला लावले आहे. एखाद्या छोट्या एसयूव्ही कारसारखी क्वीड दिसते. कंपनीच्या दाव्यानुसार, पाच लोक आरामात या कारमध्ये बसू शकतील. शिवाय, कारमध्ये एअरबॅग्जचा पर्यायही दिला आहे.

Leave a Comment