मोटोने आणला २१ मेगापिक्सलचा एक्स प्ले

moto
नवी दिल्ली – मोटोरोला या मोबाईल कंपनीने आपला नवीन मोटो एक्स प्ले स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या १६ जीबी वेरिएंटची किंमत १८,४९९ रुपये तर ३२जीबी वेरिएंटची १९,९९९ रुपये इतकी आहे. मोटोरोलाच्या या नव्या फोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर सोमवार रात्री १२ वाजल्यापासून सुरु होणार आहे.

अँड्रॉईड ५.१.१लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी १०८०x१९२० पिक्सल रिझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसुद्धा देण्यात आले आहे. यात १.७गीगाहर्ट्ज़ ६४-बिट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन ६१५ प्रोसेसर त्याचबरोबर २जीबी रॅम देखील आहेत. ग्राफिक्ससाठी एड्रेनो ४०५ जीपीयू दिला गेला आहे.

मोटो एक्स प्लेचे वैशिष्ट्य म्हणजे याचा रियर कॅमरा २१ मेगापिक्सलचा आहे, जो एफ/२.० एपरचर और डुयल-एलईडी मॉड्यूलबरोबर कलर कोरिलेटेड टैम्प्रेचर फलॅशसोबत मिळणार आहे. रियर कॅम-याने १०८० पिक्सल रिझोल्यूशनचा एचडी व्हिडीओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध होणार आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये पाण्यापासून बचाव करण्याकरिता नॅनो कोटिंग दिले गेले आहे. त्याचबरोबर यात ३६३०एमएएचची बॅटरी दिली गेली आहे त्याबाबत कंपनीने असा दावा केला आहे कि ही बॅटरी ४८ तास चालू शकते.