जागतिक बँकेच्या मानांकनात महाराष्ट्राचा क्रमांक आठवा

world-bank
मुंबई- देशामध्ये गुजरात सुलभ व्यापारासाठी पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. उद्योगांसाठी भारतातली कुठली राज्ये चांगली आहेत, या संदर्भातला अहवाल जागतिक बँकेने आज सादर केला. यात जाहीर केलेल्या मानांकनानुसार पहिल्या स्थानावर गुजरात असून पाठोपाठ आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. मात्र या यादीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तसेच या यादीत अरुणाचल प्रदेश शेवटच्या स्थानावर आहे.

Leave a Comment