देशातील ४०० रेल्वेस्थानकांवर गूगल पुरवणार मोफत वायफाय!

google
बंगळुरु : लवकरच भारतातील ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत हायस्पीड वायफाय सुविधा गूगल इंडिया पुरवणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया मिशन’च्या अंतर्गत रेल्वे मंत्रालय आणि गूगल इंडिया हाती घेणार आहे.

गूगल इंडिया आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नाने सुरु होणाऱ्या या प्रकल्पात गूगल फायबर प्रोजेक्टचा वापर केला जाणार आहे. गूगल फायबर प्रोजेक्ट अमेरिकेतील सर्वात वेगवान ब्रॉडबँड सेवा देते. हा प्रकल्प ‘प्रोजेक्ट निलगिरी’ या नावाने गूगल इंडिया आणि रेल्वे मंत्रालय देशभर राबवणार आहे. रेल्वे प्रवाशांना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी सुरुवातील देशातील ४०० रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.

युजर्स जेव्हा मोफत वायफाय सुविधेचा लाभ घेण्यासाठी लॉग इन करतील, तेव्हापासून पहिले ३४ मिनिटे वायफाय हायस्पीड असेल. त्यानंतर स्पीड कमी होत जाईल. मात्र कनेक्टिव्हीटी वायफाय क्षेत्रात असेपर्यंत कायम असेल. दरम्यान, येत्या ४ महिन्यात ‘प्रोजेक्ट निलगिरी’च्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु होणार असल्याचीही माहिती मिळते आहे.

Leave a Comment