मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत उद्योगपती; अंबानींकडे २४ अब्ज डॉलर्सची संपत्ती

mukesh-ambani
नवी दिल्ली : हुरून रिपोर्ट इंडियाने देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींच्या संपत्तीचा अभ्यास करून तयार केलेल्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत. भारतातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्तीचा मान कायम ठेवण्याचे त्यांचे हे सलग चौथे वर्ष आहे. त्यांच्याकडे २४ अब्ज डॉलर्स (१,६०,९५० कोटी रुपये) इतकी संपत्ती आहे.

या यादीत अव्वल स्थान कायम ठेवण्याचे मुकेश अंबानी यांचे हे सलग चौथे वर्ष असले, तरी त्यांच्या संपत्तीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन टक्के घट झाली असल्याचे दिसून आले. विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीतील मोठा भाग समाजकल्याणाकरिता दान दिला असल्याने टॉप फाईव्ह अब्जाधीशांच्या यादीतून ते बाहेर झाले आहेत. तिथेच, बंगळुरच्या बायोटेक क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगपती किरण मजुमदार-शॉ या यादीत स्थान मिळविणा-या एकमेव महिला आहेत. त्यांची संपत्ती ६,१४३ कोटी रुपये इतकी आहे.

Leave a Comment