अॅपलने केली आयफोन ५एस, ६ आणि ६+ च्या किंमतीत मोठी कपात

aaple
मुंबई : अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अॅपलने बुधवारी आयफोन ६एस आणि ६एस+ सह अनेक गॅझेट्स लॉन्च केले. आता प्लास्टिक बॉडीवाल्या आयफोन ५सी जगातील पहिल्या क्रमांकाची टेक कंपनी अॅपल तयार करणार नाही. त्याबरोबरच आता बाजारात आयफोन ५एस, ६ आणि ६+ चे गोल्ड व्हेरिएंटही बाजारात विक्रीसाठी अॅपल आणणार नाही. त्याचबरोबर कंपनीने आपल्या फोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

आयफोन ५एस, ६ आणि ६+ च्या गोल्ड व्हेरिएंटचे मॉडेल अॅपलच्या वेबसाईटवर उपलब्ध नाहीत. आता युजर्सना केवळ सिल्व्हर आणि स्पेस ग्रे रंगाचे हँडसेटच खरेदी करता येणार आहेत. मात्र, बुधवारी लॉन्च झालेले लेटेस्ट आयफोन ६एस आणि ६एस+ सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड आणि रोड गोल्ड रंगांमध्ये बाजारात उपलब्ध असणार आहेत.

Leave a Comment