ऑगस्टमध्ये सोन्याची विक्रमी आयात

gold
जागतिक बाजारात घसरलेले सोन्याचे दर आणि सणासुदीचे तोंडावर आलेले दिवस यामुळे ऑगस्टमध्ये १२० टन सोने भारतात आयात केले गेले आहे. या आर्थिक वर्षातील ही विक्रमी आयात असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात केंद्र सरकार ही आयात खरोखच सणासुदींच्या निमित्ताने होते आहे वा त्यामागे कांही अन्य कारणे आहेत यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचेही समजते. आयातीसंदर्भात अन्य कांही संकेत मिळालेच तर आयात शुल्कात तातडीने बदल केले जातील असेही सांगितले जात आहे. सध्या सोने आयातीवर १० टक्के शुल्क आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये ५० टन सोने आयात झाली होती. यंदा जुलै २०१५ मध्ये ९९ टन सोने आयात झाली मात्र त्यावेळी सोन्याचे दर खूपच घसरले होते. परिणामी भारत आणि चीनकडून सोन्याची मागणी वाढली होती. भारतात दरवर्षी साधारण १ हजार टन सोने आयात केले जाते. कच्च्या तेलानंतर सोने आयातीवर भारताचा सर्वाधिक खर्च होतो असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment