अवघ्या ४६ सेकंदात नाकाने टाईप केले १०३ शब्द

chaudhary
नवी दिल्ली – एक अनोखा विश्वविक्रम दिल्लीतील विनोद कुमार चौधरी या तरुणाने रचला असून त्याने ४६.३० सेकंदात १०३ शब्द नाकाने टाईप केले आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद खुर्शीद हुसेन याच्या नावावर होता. त्याने नाकाने १०३ शब्द ४७.७७ सेकंदात टाईप केले होते.

“Guinness world records have challenged me to type this sentence using my nose in the fastest time.” विनोद कुमारने हा विक्रम पूर्ण करण्यासाठी नाकाने हे वाक्य टाईप केले. हा विक्रम पूर्ण करण्यासाठी दररोज ४ तास सराव केला असे विनोद कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment